Sunday, August 30, 2015

# शाळेचे नाव - जि. प. उच्च प्राथमिक शाळा, पाथरी, केंद्र - खंबाळा, पंचायत समिती - किनवट, जिल्हा - नांदेड

# शाळेबद्दल थोडक्यात - पाथरी हे गाव किनवट तालुक्यात असून चिंचखेड वरून उत्तरेला २ किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाचा परिसर डोंगराळ व जंगलाने व्यापलेला आहे. गावाच्या उत्तर दिशेला १ किलोमीटर अंतरावरून पैनगंगा नदी वहाते. गावाच्या पश्चिमेला १ किलोमीटर अंतरावर पुरातन सीतामातेचे मंदिर आहे. गावाच्या जवळील परिसरात रोही, हरणे, माकडे, नीलगायी, अस्वल, ई. प्राणी आढळतात. गावात विविध जाती-धर्माचे लोक गुण्या गोविंदाने रहातात. अशा निसर्गरम्य परिसरात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पाथरी वसलेली आहे.

# शाळेची स्थापना - ई. स. १९५४

# शाळेचे ब्रीदवाक्य - ||विद्या विनयेन शोभते||

# माजी विद्यार्थी -

१. श्री. सद्गुण इंद्रजीतसिंग तितरे [वैष्णवी कलेक्शन कापड दुकानाचे मालक]
२. श्री. चरण इंद्रजीतसिंग तितरे [संगणक अभियंता]
३. अनिल कबीरसिंग राठोड [प्रा. शिक्षक, नाशिक]
४. श्री. देवराव एस. सोयाम [माजी समाजकल्याण अधिकारी, नांदेड]
५. श्री. रामलू नरसिंगमलू मंदलवार [शिपाई, उपशिक्षण अधिकारी कार्यालय, किनवट]

# शाळेत राबवले जाणारे उपक्रम -

१. विज्ञान प्रदर्शन
२. स्नेह संमेलन
३. ग्रामस्वच्छता अभियान
४. बंधारा योजना
५. आदर्श परिपाठ
६. रक्षाबंधन कार्यक्रम
७. सुंदर बगीचा
८. थोर महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी
९. क्रीडा स्पर्धा
१०. वृक्षारोपण व वृक्षसंगोपन
११. योगासने व व्यायाम
असे अनेक उपक्रम

# शाळेची प्रवेश प्रक्रिया - शासकीय नियमाप्रमाणे, शाळा सुरु होण्यापूर्वी

# शाळेचा दूरध्वनी/इमेल -
७७१९८३००६५
७५८८८७५४०४
zppspathari@gmail.com

# शाळेची फी - निःशुल्क

# खेळाचे मैदान - आहे. विविध खेळाचे साहित्य देखील आहे.

# शाळेची यशोगाथा -

१. शै. वर्ष २०१४-१५ मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे सफल आयोजन. केंद्र प्रमुख व शि. वि. अ. यांच्याकडून विशेष अभिनंदन.

२. आंतर शालेय केंद्रस्तरीय स्पर्धात्मक सांस्कृतिक सृजन महोत्सवामध्ये द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक

३.  शै. वर्ष २०१५-१६ शै. उठावांतर्गत तंत्रस्नेही शाळेच्या निर्मितीला यशस्वीरीत्या शुभारंभ

४. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा ८३% निकाल व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा ६०% निकाल

५. इयत्ता पहिली पासून इंग्रजी विषयाचे आनंददायी अध्ययन व अध्यापन

६. विद्यार्थ्यांना शाळेत बागकामाचे धडे

७. शालेय व्यवस्थापन समितीचे सहकार्य, लोकसहकार्य, लोकसहभाग, विद्यार्थ्यांची गुणवत्ता सामाधानकारक

# शिक्षकवृंद -

१. श्री, निलेश देवरावजी हेडावू, प्रा.प, प्र. मु. अ.
२. श्री. शिवशंकर रघुनाथ डावरे स. शि.
३. श्री. सुनील रामसिंग पवार
४. श्री. यादव मष्णाजी  देवकते स. शि.
५. श्री. संदीप भिमराव पाटील स. शि.

# फोटो -